Pm Kisan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कालचा दिवस खूपच आनंदाचा राहिला आहे. कारण की, काल अर्थातच 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रित रित्या वितरित करण्यात आला आहे.
अर्थातच काल महाराष्ट्रातील पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना तब्बल सहा हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला गेला आहे.
खरंतर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर आले होते आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही योजनेच्या पैशांचे वितरण करण्यात आले आहे. आज नरेंद्र मोदी पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे चार हजार असे एकूण सहा हजार रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले गेले आहेत.
मात्र, अनेकांच्या माध्यमातून जर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळाला नसेल तर काय केले पाहिजे ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता मिळाला नाही तर काय करणार
जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र राहतील त्यांनाच नमो शेतकरीचा लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्यांना पीएम किसानचा लाभ मिळणार नाही त्यांना नमो शेतकरीच्या लाभापासून देखील वंचित राहावे लागणार आहे.
अशा परिस्थितीत जर कोणाला पीएम किसान योजनेचा काल जमा झालेला हप्ता मिळाला नसेल तर अशा लाभार्थ्यांना नमो शेतकरीचा देखील लाभ मिळालेला नसेल.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नसेल त्यांनी काय करावे असा सवाल काही लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात होता ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसान योजनेचे पैसे काही कारणांमुळे अडकू शकतात.
ज्या शेतकऱ्यांनी जमिनीचे सत्यापण म्हणजेच लँड सीडींग, ई-केवायसी, आधार सिडींग केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळालेला नसेल. याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडून या योजनेचा फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील जसे की नाव, लिंग, आधार क्रमांक, इत्यादीमध्ये काही मिस्टेक झाली असेल तरीसुद्धा या योजनेचा हप्ता अटकू शकतो.
यामुळे जर तुमचाही पीएम किसान चा 16 वा हफ्ता अटकला असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित भरला आहे की नाही हे चेक करायचे आहे शिवाय तुम्ही लँड सीडींग केवायसी आधार सिलिंग यांसारख्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेले आहेत की नाही हे चेक करायचे आहे.