Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्राच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. 2019 मध्ये या शेतकरी योजनेचा शुभारंभ झाला असून आत्तापर्यंत अविरतपणे सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचे प्रावधान आहे.
परंतु शेतकऱ्यांना हे सहा हजार रुपये एकरकमी न देता टप्प्याटप्प्यात दिले जातात. म्हणजेच दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेचे स्वरूप आखण्यात आले आहे. दरम्यान आम्ही आपणास सांगू इच्छितो की आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
आता शेतकरी बांधव 13 वा हप्ता कधी येईल याची वाट पाहत आहे. दरम्यान या योजनेच्या तेराव्या हफ्त्याबाबत एका प्रतिष्ठित न्यूज एजन्सीच्या माध्यमातून एक मोठी माहिती समोर आली. हाती आलेल्या माहितीनुसार, आता तेरावा हफ्ता हा जानेवारी महिन्यात नाही तर फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. याशिवाय हा हप्ता उशिरा येण्यामागे काही कारणे देखील सांगितली गेली आहेत.
मीडिया रिपोर्ट नुसार, मध्यंतरी या योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला. परिणामी या योजनेचे काही नियम बदलण्यात आले. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना जमिनीची पडताळणी देखील करण्यास सांगितले गेले आहे. निश्चितच यासाठी शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना केवायसी आणि जमीन पडताळणी करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा या अनुषंगाने हा हप्ता जानेवारी ऐवजी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
दरम्यान, अनेक वेळा या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना हप्ते मिळण्यात, पडताळणी करण्यात किंवा त्यांचे इतर तपशील म्हणजे माहिती बदलण्यात अडचणी येत असतात. मात्र अनेकदा अधिकारी उपलब्ध होत नाहीत. शिवाय अधिकाऱ्यांकडे जाऊन अडचणीचे निरासरण करण्यासाठी अधिक वेळ शेतकऱ्यांचा वाया जातो. अशा परिस्थितीत या योजने संदर्भात काही अडचणी असल्यास आता शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही.
कारण की शासनाने आता यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. या योजने संदर्भात काही अडचणी असल्यास शेतकरी आता हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकणार आहेत आणि आपल्या समस्येचे निराकरण करू शकणार आहेत. यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
या योजनेस संदर्भात तक्रारी असल्यास शेतकरी 1551261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर कॉल करून उपाय मिळवू शकणार आहेत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना हवे असल्यास ते [email protected] या ईमेलवर मेल करू शकणार आहेत.