Pm Kisan Yojana : भारतात शेतकरी (Farmer) हिताच्या अनेक योजना (Farmer Scheme) राबवल्या जातात. केंद्र सरकार (Central Government) तसेच वेगवेगळ्या राज्यातील राज्य सरकारे (State Government) आपल्या स्तरावर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना (Agricultural Scheme) राबवतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील केंद्र सरकारने सुरू केलेल्या अनेक शेतकरी हिताच्या योजनेपैकी एक आहे. या योजनेचा आपल्या देशातील कोट्यावधी शेतकरी बांधव लाभ घेत आहेत.
एका आकडेवारीनुसार आपल्या देशातील दहा कोटींहून अधिक शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेत असून आपल्या राज्यातील सुमारे एक कोटीच्या आसपास शेतकरी बांधव या योजनेद्वारे लाभान्वित होतं आहेत. दरम्यान या योजनेचे पात्र शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आता या योजनेच्या बाराव्या हफ्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आल आहे. हाती आलेल्या ताज्या अपडेटनुसार, सप्टेंबर महिन्यात कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांची रक्कम पाठवली जाऊ शकते.
या दरम्यान पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर एक मोठा बदल देखील झाला आहे. यामुळे आज आपण वेबसाईटवर नेमका कुठला बदल झाला आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाय बारावा हप्ता संदर्भात काय हालचाली सुरू आहेत याचा देखील आढावा घेणार आहोत.
पीएम किसानच्या वेबसाइटवर आलं हे मोठ अपडेट
मित्रांनो खरं पाहता, पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर ई-केवायसीच्या शेवटच्या तारखेबाबत दिले जाणारे अपडेट काढून टाकण्यात आले आहे. पूर्वी तिथे शेवटची तारीख लिहिलेली दिसायची. तथापि, वेबसाइटवर ई-केवायसी करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध आहे. शेतकरी पोर्टलद्वारे किंवा जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
या शेतकऱ्यांचे पैसे लटकू शकतात
दरम्यान, मीडिया रिपोर्ट मध्ये दावा केला जात आहे की, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांचे पैसे अडकू शकतात. दरम्यान बाराव्या हफ्त्याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार काही राज्य सरकारांनी 12 व्या हप्त्याला मंजुरी दिली आहे आणि काहींची मंजुरी अद्याप बाकी आहे, त्यामुळे शेतकरी नवीनतम अद्यतनांसाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन योजनेसंदर्भात अपडेट जाणून घेऊ शकता.
पीएम किसान लाभार्थ्यांची संख्या कमी होणार बर…!
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, या 12 व्या हफ्त्याच्या वेळी पीएम किसान लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. ताज्या अपडेटनुसार, अनेक ठिकाणी भुलेख पडताळणीचे काम अद्याप सुरू आहे.
तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध लाभार्थी समोर आले आहेत. या शेतकऱ्यांना सरकारने आतापर्यंत घेतलेले सर्व हप्ते परत करण्याची नोटीस देखील पाठवली आहे. यामुळे आता पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कटोती होणार आहे.