Pm Kisan Yojana Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना अर्थातच पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आलं आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना अल्पभूधारक गरीब शेतकरी बांधवांसाठी अतिशय लाभदायक सिद्ध होत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
हे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकूण तीन हप्त्यात मिळतात. म्हणजेच शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एका वर्षात तीन हप्ते दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत.
दरम्यान येत्या काही दिवसात या योजनेचा तेरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशातच आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना अजून एक मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. खरं पाहता पुढील वर्षात केंद्रीय संकल्प सादर होणार आहे.
अर्थातचं अर्थसंकल्पात शेतकरी हिताच्या अनेक योजनेंविषयी चर्चा होणार असून अनेक योजनेसाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा अर्थसंकल्प राहणार आहे. यामुळे या अर्थसंकल्पात शेतकरी हिताच्या मुद्द्यावर हात घातला जाणार आहे.
खरं पाहता कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. आता कुठे अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात वाढत्या महागाईसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस उपाय योजना आखली जाईल अशी आशा आहे. दरम्यान एका मीडिया रिपोर्ट नुसार या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेच्या रकमेत शासनाकडून वाढ केली जाणार आहे.
सध्या स्थितीला या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. मात्र या अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 8000 रुपये म्हणजेच एका वर्षात 2 हजाराचे चार हफ्ते देण्यासंदर्भात विचार होऊ शकतो. निश्चितच या मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आलेला हा दावा जर प्रत्यक्षात खरा उतरला तर या योजनेच्या जवळपास आठ कोटी पात्र शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे.