Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरेतर पीएम किसान ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. तेव्हापासून अविरतपणे ही योजना सुरू आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे.
मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. म्हणजेच दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. एका आर्थिक वर्षात एका पात्र शेतकऱ्याला तीन हफ्ते मिळून 6 हजार मिळतात.
यानुसार आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हप्ते जमा करण्यात आले आहेत. सतरावा हप्ता हा 18 जून 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील अठराव्या हप्त्याची आतुरता लागून आहे.
पात्र लाभार्थ्यांचे पुढील हफ्त्याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान आता याच पुढील हफ्त्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील हप्ता येत्या दोन महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. तथापि या संदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाही.
यामुळे या योजनेचा पैसा खरंच ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात ही एक मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी चा पुढील हफ्ता म्हणजे चौथा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा पुढील चौथा हप्ता या चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. तथापि शिंदे सरकारकडून याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही.
मात्र आगामी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम लक्षात घेता शिंदे सरकार या योजनेचा पुढील चौथा हप्ता हा लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार अशी दाट शक्यता आहे.