Pm Kisan Yojana: केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमीचं प्रयत्नरत असते. यांच्या हितासाठी केंद्र सरकार (Central Government) नेहमीच नवनवीन योजना (Farmer Scheme) कार्यान्वित करत असते.
2019 मध्ये देखील केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) नामक एक महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
विशेष म्हणजे या योजनेचा आपल्या राज्यातील (Maharashtra Farmer) सुमारे एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत पात्र शेतकऱ्यांना एकूण तीन हाफ त्यांच्या स्वरूपात दिली जाते.
अर्थातचं दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे तीन हप्ते पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जातात. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी बांधवांना 11 हप्ते देण्यात आले आहेत.
म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 22 हजारांची मदत केंद्र सरकार मार्फत दिली गेली आहे. या योजनेचा अकरावा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
खरं पाहता, केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी पीएम किसान सन्मान निधी योजना अलीकडे शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरत आहे, ज्याचा लाभही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मित्रांनो आज आपण या योजनेचा बारावा हप्ता केव्हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल याविषयी जाणून घेणार आहोत.
हप्त्याची वेळ काय आहे ते जाणून घ्या
आपल्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, पीएम किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान खात्यात हस्तांतरित केला जातो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान खात्यात जमा केला जातो, तर तिसरा 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान खात्यात पाठवला जातो.
या योजनेअंतर्गत, सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये खात्यात वार्षिक 6,000 रुपये हस्तांतरित करते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो, पी एम किसान चा पुढचा हप्ता म्हणजेच 12 वा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.