Pm Kisan Yojana : 2018 पासून पीएम किसान योजना राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून आजतागायत ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो.
एकूण तीन टप्प्यात वार्षिक सहा हजाराचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. म्हणजेच दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ शेतकऱ्यांना विपरीत केला जातो. विशेष बाब म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून थेट शासनाकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते.
यामध्ये महाराष्ट्रातीलही जवळपास एक कोटीच्या आसपास शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहे. याआधी या योजनेसाठी जवळपास एक कोटी वीस लाख शेतकरी राज्यातून पात्र ठरले होते. मात्र योजनेच्या निकषात बदल झाला आहे. आता केवायसी करणे, बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे, जमिनीची माहिती पुरवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित होत आहेत.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन या योजने संदर्भात एक मोठी माहिती हाती येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र शेतकऱ्यांपैकी जवळपास 18% शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन लाख 82 हजार 744 शेतकरी पात्र ठरले आहेत.
मात्र यापैकी जवळपास 18% अर्थातच 70 हजार 214 शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे या शेतकऱ्यांनी जर केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर या शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जाऊ शकते. आता येत्या काही दिवसात या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
अशा परिस्थितीत हा हप्ता देखील या शेतकऱ्यांना दिला जाणार नाही असे सांगितले जात आहे. म्हणून संबंधित केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
तालुक्यानुसार केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या
वैजापूर १३७२९ शेतकरी, पैठण १२९२२, छत्रपती संभाजीनगर 7500, सोयगाव 3430, खुलताबाद 2794, गंगापूर 8307, कन्नड 7600, फुलंब्री 5 हजार 74, सिल्लोड 7 हजार 732.