Pm Kisan Yojana : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना (Farmer Scheme) सुरू केल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना (Yojana) आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत (Subsidy) दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजाराच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळत असते. म्हणजे एका आर्थिक वर्षात शेतकरी बांधवांना दोन हजाराचे तीन हप्ते मिळत असतात.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 10 कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना 11 हप्ते मिळाले आहेत. आता शेतकरी पुढच्या म्हणजे बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेत आहेत.
12वा हप्ता कधी येणार बर?
हाती आलेल्या ताज्या अपडेटनुसार, पीएम किसान योजनेचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. याबाबत मीडिया रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. निश्चितचं बाराव्या हफ्त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीला वेग आला आहे. ई-केवायसीसाठी वेळ मर्यादा पर्याय वेबसाइटवरून काढून टाकण्यात आला आहे. तथापि, शेतकरी अद्याप पोर्टलद्वारे ई-केवायसी करू शकतात. जाणकार लोकांच्या मते ज्या लोकांनी केवायसी केलेले नाही अशा लोकांना बारावा हप्ता मिळणार नाही.
या लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही
या योजनेच्या नियमावलीनुसार, सर्व डॉक्टर, प्राध्यापक, अभियंता यासारख्या व्यवसायातील लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. संस्थात्मक जमीनधारक, घटनात्मक पदे असलेले शेतकरी कुटुंबे, राज्य किंवा केंद्र सरकारचे सेवारत किंवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारी स्वायत्त संस्था यांचा समावेश होतो.
सेवानिवृत्त पेन्शनधारक आणि 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन असलेले आयकरदाते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी करताना चुकीची माहिती भरली आहे किंवा चुकीचे बँक खाते आणि आधार क्रमांक टाकला आहे, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाभार्थी यादीत तुमचं नाव तपासा
PM किसान योजनेचा 12 वा हप्ता तुमच्या खात्यात येईल की नाही याबद्दल तुमच्या मनात शंका असल्यास, ते जाणून घेण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. सर्वप्रथम, तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा आणि नंतर लाभार्थी यादीवर क्लिक करा. तेथे लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा. लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला निश्चितच या योजनेचा बारावा हफ्ता मिळणार आहे.