Pm Kisan Yojana : केंद्रातील सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. एका आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात ट्रान्सफर केली जाते.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 16 हप्ते मिळालेले आहेत. मागील सोळावा हप्ता हा यवतमाळ येथील एका कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. 28 फेब्रुवारी 2024 रोजी मागील सोळावा हफ्ता शेतकऱ्यांना मिळाला असून आता पुढील हफ्ता कधी मिळतो याबाबत जाणून घेण्याची शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
दरम्यान याच योजनेच्या पुढील सतराव्या हफ्त्यासंदर्भात एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अर्थात चार जून नंतर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.
जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या योजनेच्या 17व्या हफ्त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळणार नाही. दरम्यान आज आपण या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.
कोणाला मिळणार नाही लाभ?
पीएम किसान सन्मान निधी योजना ही नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक स्वप्नातली योजना आहे. या योजनेचा अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. विशेष म्हणजे सरकार देखील यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र याचा लाभ हा काही शेतकऱ्यांना मिळणार नाही.
ई-केवायसी आणि लँड व्हेरिफिकेशन : ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि ज्यांनी लँड व्हेरिफिकेशन पूर्ण केलेले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला लाभ : या योजनेचा एका शेतकरी कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला लाभ मिळणार आहे. याचा अर्थ एकाच कुटुंबात राहत असलेल्या शेतकरी पिता आणि पुत्र या पैकी एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार आहे.
सरकारी नोकरी : कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत काम करत असेल तर अशा कुटुंबातील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.
व्यावसायिक : जर कुटुंबातील कोणताही सदस्य व्यावसायिक असेल, जसे वकील, डॉक्टर, अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षक किंवा इतर कोणत्याही व्यवसायात काम करत असेल तर ते देखील या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.
रेंटल फार्मिंग : या योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, जे शेतकरी दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करतात ते या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.