Pm Kisan Yojana: मोदी सरकारने (Modi Government) देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी अनेक शेतकरी हिताच्या योजना राबवल्या आहेत. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) देखील समावेश आहे. या योजनेच्या (Scheme) माध्यमातून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या सरळ खात्यात केंद्राकडून ही आर्थिक मदत दिली जात आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र सरकारच्या (Central Government) या महत्वाकांक्षी योजनेतून आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. 11वा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. यामुळे शेतकरी आता बाराव्या हप्त्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता कधी येऊ शकतो?
ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात कोणत्याही तारखेला 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो, अशी माहिती आता समोर येत आहे. वास्तविक, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे दर 4 महिन्यांनी 2-2 हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात दिले जातात.
शेवटचा म्हणजे 11 वा हप्ता केंद्र सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला होता. त्यावेळी दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते. यावेळी देखील एवढ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत.
या शेतकऱ्यांचे या योजनेचे अडकलेले पैसे मिळू शकतात
मित्रांनो पीएम किसान योजनेचे जरी सर्व लाभार्थी 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या हप्त्याचे पैसे अडकवले जाऊ शकतात.
खरं पाहता केव्हायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांना पुढील हप्ता मिळणे कठीण होऊ शकते.