Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी (Pm Kisan Sanman Nidhi) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmer Scheme) आहे. या योजनेचा (Yojana) शुभारंभ 2019 मध्ये वर्तमान मोदी सरकारने (Modi Government) केला आहे. या योजनेचा देशभरातील 12 कोटींच्या आसपास शेतकरी बांधव (Farmer) लाभ घेत आहेत.
आता पीएम किसानच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी मोठी गोड आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आणि एका मीडिया रिपोर्ट नुसार दिवाळीपूर्वी, मोदी सरकार या आठवड्यात देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये हस्तांतरित करणार आहेत.
17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 व्या हप्त्याअंतर्गत 16000 कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. निश्चितच पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी बांधव घेत असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. यामुळे आपल्या राज्यातील देखील एक कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना या बाराव्या हप्त्याचा दिलासा मिळणार असून शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे.
17 ऑक्टोबर रोजी 11 वाजता खात्यात पैसे येतील बर
कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पीएम किसानचा 12 वा हप्ता जारी करतील. 17 ऑक्टोबर रोजी देशाची राजधानी नवी दिल्लीच्या फेअर ग्राउंड IARI पुसा येथे पंतप्रधान मोदी ‘पीएम किसान संमेलन 2022’ ला संबोधित करतील. त्यावेळी पीएम मोदी देशातील बारा कोटीहून अधिक पीएम किसानच्या पात्र शेतकर्यांना बारावा हप्ता हस्तांतरित करणार असल्याचे सदर कॉमन सर्व्हिस सेंटरच्या ट्विटर हँडलवर स्पष्ट करण्यात आले आहे.
निश्चितच देशातील शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी पीएम किसानच्या या हफ्त्याची मदत होणार आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील बहुतांशी शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी आवश्यक केवायसी केलेली नसल्याने या योजनेचा बारावा हप्ता हा उशिरा शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील पीएम किसानचे लाभार्थी असाल आणि अद्याप या योजनेसाठी आवश्यक केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या अन्यथा आपणास बाराव्या हफ्त्यापासून वंचित रहावे लागू शकते.