Pm Kisan Yojana : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेचे संपूर्ण देशात जवळपास साडेआठ कोटी लाभार्थी शेतकरी आहेत. सुरुवातीला हा आकडा दहा कोटींच्यावर होता.
यानंतर मात्र शासनाने या योजनेचे नियम कडक केल्याने योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात घट आली. या योजनेअंतर्गत देशातील साडेआठ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे.
परंतु हे पैसे शेतकऱ्यांना एक रक्कमी दिले जात नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत. मागील 15वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.
दरम्यान आता शेतकऱ्यांना या योजनेच्या सोळाव्या हफ्त्याचे वेध लागलेले आहे. योजनेचा पुढील हप्ता खात्यात केव्हा जमा होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील हप्ता हा नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात तीन हप्ते मिळतात. आतापर्यंत या चालू आर्थिक वर्षातील दोन हफ्ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. यामुळे आता या योजनेचा आगामी तिसरा हप्ता मार्च 2024 अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे.
शेष बाब अशी की पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. दरम्यान या निवडणुकांपूर्वीच फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प देखील सादर केला जाणार आहे.
त्यामुळे या केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान पी एम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात जमा होऊ शकते. दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचे पैसे वाढतील असा देखील दावा करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत आता वार्षिक 6000 नाही तर 9000 रुपये मिळू शकतात असे बोलले जात आहे. याबाबत मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.