Pm Kisan Yojana : तुम्हीही केंद्रातील मोदी सरकारच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात का? हो, मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
निश्चितच तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसानच्या सोळाव्या हफ्त्याची वाट पाहत असाल, आता मात्र तुमची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण की, पीएम किसानचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असे वृत्त समोर आले आहे.
काय आहे पीएम किसान योजना ?
पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. योजनेची सुरुवात 2019 मध्ये वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली आहे. ही योजना मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा आर्थिक लाभ केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे.
मात्र या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा शेतकऱ्यांना एकरकमी मिळत नाही. अर्थातच एका आर्थिक वर्षात दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.
या योजनेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून ते आजतागायत पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते देऊ करण्यात आले आहे.
अर्थात, ज्या शेतकऱ्याने या योजनेचा पहिल्या हप्त्यापासून लाभ घेतलेला असेल त्याला आत्तापर्यंत 30 हजार रुपयाचा लाभ मिळालेला आहे.
दरम्यान, मागील 15वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 ला खात्यात जमा झाला असल्याने पुढील सोळावा हप्ता कोणत्या तारखेला येणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याचबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
केव्हा जमा होणार सोळावा हफ्ता ?
खरे तर येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार निवडणुकांपूर्वीच पीएम किसानचा 16 वा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये 27 फेब्रुवारी 2023 ला नवीन वर्षाचा पहिला हप्ता आणि योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्यात आला असल्याने याही वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुढील हप्ता जमा होईल असा दावा केला जात आहे.