Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. या शेतकरी हिताच्या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच करण्यात आली होती.
याचा फायदा केंद्रातील मोदी सरकारला मागील लोकसभा निवडणुकांमध्ये झाला होता. खरेतर ही योजना शेतकऱ्यांमध्ये गेल्या 5 वर्षांच्या काळात खूपच लोकप्रिय बनली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जात आहेत.
2 हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वाटप होते. म्हणजेच, शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा एकमुस्त मिळत नाही. मात्र टप्प्याटप्प्याने का होईना पण या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशांमुळे अनेक गरजवंत शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
परिणामी गरजू शेतकऱ्यांमध्ये या योजनेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान या लोकप्रिय योजनेची कॉपी देखील होऊ लागली आहे. या योजनेची लोकप्रियता पाहता महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 6000 आणि पीएम किसानचे सहा हजार असे एकूण 12,000 रुपये आता दरवर्षी उपलब्ध होणार आहेत. पीएम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत पीएम किसानचे 15 हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत.
शेतकऱ्यांना आता या योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वेध लागले आहे. या योजनेचा पुढील हप्ता कोणत्या मुहूर्तावर जमा होणार हाच सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
पीएम किसानचा सोळावा हप्ता केव्हा जमा होणार
पीएम किसानचे हप्ते दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात हे आपल्याला ठाऊकच असेल. मात्र, येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि या निवडणुकांपूर्वी आचारसंहिता लागू होणार आहे.
यामुळे या योजनेचा हप्ता हा आचारसहितापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो का ? तर याचे उत्तर हो असे आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर पीएम किसानचा 16वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होणार अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे चित्र तयार होत आहे.