Pm Kisan Yojana : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात आहे. Pm किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 19 वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो या संदर्भात एक नवी अपडेट हाती आली आहे.
खरेतर, देशातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे, म्हणजे या योजनेसाठी लागणारा सारा पैसा केंद्राकडून दिला जातो.
याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना मिळतो. या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकरकमी मिळतं नाहीत तर दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे दिले जातात.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हफ्ते मिळाले आहेत. या योजनेचा अठरावा हफ्ता पाच ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
दरम्यान आता केंद्रातील सरकारकडून या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत रिलीज केला जाऊ शकतो यासंदर्भात मीडिया रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा पुढील 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, हा फक्त एक अंदाज आहे.
प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो असा एक अंदाज बांधला जात आहे.
पण, सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. तथापि, 19 वा हप्ता अर्थसंकल्प 2025 नंतरच जारी केला जाईल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.
दरम्यान, हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजे एक फेब्रुवारी नंतर कधीही या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.