Pm Kisan Yojana : गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व नुकताच संपन्न झाला आहे. आता संपूर्ण देशभरात लवकरच नवरात्र उत्सवाची धूम सुरू होणार आहे. नवरात्र उत्सवानंतर विजयादशमी अर्थातच दसरा आणि नंतर दिवाळीचा सण साजरा केला जाईल. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे.
या अशा आनंदाच्या वातावरणात शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित करणारी बातमी सुरू आली आहे. ही बातमी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याची तारीख ठरली आहे. खरे तर पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे.
केंद्रातील मोदी सरकारने ही योजना सुरू केली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. मात्र हे पैसे एकाच वेळी न देता दोन हजार रुपयाचा एक हफ्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्ते मिळाले आहेत.
सतरावा हप्ता 18 जून 2024 ला वाराणसी येथे आयोजित एका कार्यक्रमाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान आता या योजनेचा पुढील अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
कधी जमा होणार पैसे ?
अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी बातमी समोर येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा आधीच या योजनेचा पैसा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
नेमक्या कोणत्या तारखेला या योजनेचा पैसा जमा होणार याबाबत अजून कोणतीचं माहिती हाती आलेली नाही. परंतु दिवाळीचा सण असल्याने या योजनेचे पैसे दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असे बोलले जात आहे. असे झाल्यास पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही दिवाळीची एक मोठी भेट ठरणार आहे.
मात्र या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना याचा लाभ मिळणार नाही. यामुळे जर तुम्ही अजून केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.
ई-केवायसी कशी करणार
केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. या पीएम किसान च्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर त्याच्या होमपेजवरील Farmers Corner या सेक्शनमध्ये जावे लागणार आहे.
मग त्यानंतर eKYC पर्याय निवडायचा आहे. पुढे eKYC पेजवर १२ अंकी आधार नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकायचा आहे.
मग सबमिट बटणवर क्लिक करा. अशा तऱ्हेने तुमची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबतचा एक मेसेज पाठवला जाणार आहे.