Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजाराचा लाभ दिला जात आहे. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त दिले जात नाहीत.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. या योजनेचे आतापर्यंत 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मागील सतरावा हप्ता हा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
18 जून 2024 ला हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पीएम किसानचा सोळावा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. 28 फेब्रुवारी 2024 ला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
दरम्यान, आता या योजनेचा पुढील अठरावा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या योजनेचा पुढील 18 वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे येत्या काही दिवसात ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्या तारखेला या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल या संदर्भात केंद्र सरकारकडून घोषणा देखील केली जाणार आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस केंद्र सरकार या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही घोषणा केली जाणार आहे.
तथापि, काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अठरावा हप्ता हा दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असे म्हटले जात आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिवाळीचा पर्व सुरू राहील.
दरम्यान, दिवाळीचा पर्व सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्याच्या आधीच योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे.
नक्कीच जर दिवाळीच्या आधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा झाला तर शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांचा दिवाळीचा सण गोड होईल अशी आशा आहे.