Pm Kisan Yojana : पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक आहे. याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांना हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वितरित केले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मागील सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील एका कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सतरावा हप्ता केव्हा जाहीर होऊ शकतो याबाबत मोठी अपडेट देखील समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान चा पुढील 17 वा हप्ता हा शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो असा दावा काय मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट मध्ये आचारसंहिताचा काळ सुरू असल्याने पी एम किसान चा पुढील 17 वा हप्ता हा लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर अर्थातच जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे म्हटले जात आहे.
मात्र शासनाच्या माध्यमातून अजूनही या संदर्भात कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. खरे तर ही योजना सुरू होऊन आता पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. मात्र असे असले तरी अनेकांच्या माध्यमातून या योजने संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एकाच घरातील दोन व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो का किंवा एकाच घरातील वडील आणि मुलगा यांना या योजनेला लाभ घेता येतो का? असा देखील प्रश्न काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता आपण याबाबत योजनेचे नियम काय सांगतात? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम किसानचे नियम काय सांगतात
एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा दोघांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का? एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा या दोघांना या योजनेचा पुढील 17वा हप्ता मिळणार का ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला लाभ घेता येतो.
म्हणजेच जर वडिलांना लाभ मिळत असेल तर मुलाला मिळणार नाही आणि जर मुलाला मिळत असेल तर वडिलांना लाभ घेता येणार नाही.
पण, PM किसानच्या नियमांनुसार वडील आणि मुलगा यांच्या नावावर वेगवेगळ्या जमिनी असतील आणि ते एकाच कुटुंबात राहत नसतील म्हणजेच विभक्त राहत असतील, वेगवेगळे राहत असतील तर मात्र त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.