Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2014 साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. खरं पाहता ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो.
हा निधी संबंधित पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे दिला जातो. म्हणजेच या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते मिळतात. आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. सध्या या योजनेचे पात्र शेतकरी तेराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अशातच केंद्र शासनाने या योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. शासनाने आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र आपल्या राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या जवळपास 90 हजार 118 शेतकऱ्यांनी या योजनेसाठी केवायसी केलेली नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
दरम्यान 26 जानेवारीच्या आधी या योजनेचा तेरावा हप्ता मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही ते शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. शासनाने आतापर्यंत केवायसी करण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली आहे.
परंतु असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. यामुळे केंद्र शासनाकडून 31 डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल असा आता आदेश पारित केला आहे. यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली नसेल त्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे.
याबाबत अहमदनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतः बँकेत जाऊन स्वतःचे बँक खाते आधारशी संलग्न करण्याचा सल्ला दिला आहे. निश्चितच जर 31 डिसेंबर येण्याआधी अहमदनगर जिल्ह्यातील 90 हजार 118 शेतकरी बांधवांनी केवायसी केली नाही तर त्यांना या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते.
अहमदनगर जिल्ह्यातील तालुकाप्रमाणे केवायसी न केलेले शेतकरी
तालुका | केव्हायसी न केलेले शेतकरी |
अकोले | 5488 |
जामखेड | 6966 |
कर्जत | 6686 |
कोपरगाव | 3745 |
नगर | 5961 |
नेवासा | 6038 |
पारनेर | 9125 |
पाथर्डी | 9014 |
राहता | 2924 |
राहुरी | 5612 |
संगमनेर | 7639 |
शेवगाव | 7097 |
श्रीगोंदा | 8751 |
श्रीरामपूर | 2985 |
इतर | 2087 |
एकूण | 90118 |