Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गणेशोत्सवाच्या या शुभ मुहूर्तावर एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर गणेशोत्सवाचा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जात आहे. सात सप्टेंबर पासून सुरू झालेला गणेशोत्सव 17 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान याच आनंदाच्या वातावरणात शेतकऱ्यांचा आनंद आणखी द्विगुणीत करणारी बातमी समोर येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत किती हफ्ते मिळालेत?
पी एम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू झालेली केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. याची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून याची अंमलबजावणी अविरतपणे सुरू आहे.
या अंतर्गत प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. म्हणजेच एका वर्षात या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत या योजनेचे एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
मागील सतरावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर 18 जून 2024 ला या योजनेचा सतरावा हप्ता पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.
आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील 18 व्या हफ्त्याची आतुरता लागलेली आहे. हा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार? हा मोठा यक्षप्रश्न असून या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने विचारणा सुरू आहे.
कधी जमा होणार अठरावा हफ्ता?
मीडिया रिपोर्टनुसार, या योजनेचा अठरावा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. पुढील ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला दिवाळीचा सण सुरू होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी पाडवा राहणार आहे.
अशा परिस्थितीत, जर दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा पैसा जमा झाला तर त्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकणार आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर यावेळी दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरावा हप्ता जमा केला जाणार आहे.
तथापि अठरावा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर डिपॉझिट होणार यासंदर्भात अजून सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मात्र या योजनेचा आजवरचा इतिहास पाहिला तर प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात या योजनेचे पैसे हमखास शेतकऱ्यांना मिळतील असे बोलले जात आहे.