Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. परंतु हे 6000 रुपये एकरकमी न देता दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे दिले जातात.
म्हणजेच एका वर्षात या योजनेचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते मिळालेले आहेत. मागील सतरावा हप्ता हा 18 जून 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला.
श्रीक्षेत्र वाराणसी येथे आयोजित एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये केवळ एका क्लिकने जमा केला. आता या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हफ्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हा मोठा यक्षप्रश्न आहे.
दरम्यान, आता याच प्रश्नाचे उत्तर समोर आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर मध्ये विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचे मोठे सण येणार आहेत. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पैशांची गरज भासणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची हीच गरज लक्षात घेता या सणासुदीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे दिले जाणार असा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.
परंतु या संदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकारने अनेकदा सणासुदीच्या हंगामाआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा केले आहेत.
यामुळे विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळी सणाच्या पूर्वीच या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असे वृत्त समोर आले आहे. नक्कीच जर मोदी सरकारने या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला तर याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याने कोट्यावधी शेतकऱ्यांचा विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचा सण गोड होईल अशी आशा आहे.