Pm Kisan Yojana : भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हेतू पीएम किसान सन्मान निधी ही योजना सुरू करण्यात आली आहे. 2019 मध्ये सुरु झालेली केंद्र शासनाची ही एक एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत आता शेतकरी 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या योजनेतून देशातील बहुतांशी शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे देशातील दोन कोटी हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 वा हप्ता पोहोचलेला नाही.
याबाबतची माहिती घेण्यासाठी ते कृषी विभाग व जनसेवा केंद्रापर्यंत पोहोचत आहेत. त्याच बरोबर केंद्र सरकार हप्ते मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या अटींची पूर्तता न करणाऱ्या अशा शेतकऱ्यांची छाटणी करण्यात गुंतले आहे. दरम्यान आता 13 व्या हप्त्यासंदर्भात आणखी एक अपडेट समोर आले आहे.
ते म्हणजे काही मीडिया रिपोर्ट मध्ये नवीन वर्षात शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याची भेट मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. सदर सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना एकूण तीन हप्त्यात मिळत असतात.
म्हणजेच दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेचे स्वरूप आहे. आतापर्यंत योजनेच्या पात्र शेतकरी बांधवांना दोन हजाराचे बारा हप्ते म्हणजेच 24 हजार रुपये ट्रान्सफर झाले आहेत. आता तेरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्ट मध्ये डिसेंबर मध्ये तेरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल असा दावा केला जात होता.
परंतु वस्तुस्थिती पाहता हा हप्ता या महिन्यात वर्ग होण्याची शक्यता नाही. पण जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की याबाबत शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती सार्वजनिक झालेली नाही. मीडिया रिपोर्ट मध्ये मात्र हा तेरावा हप्ता जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळेल असा दावा करण्यात आला आहे.