Pm Kisan Yojana : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत आपल्या देशातील शेतकर्यांची (Farmer) भूमिका महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल.
यामुळे देशातील शेतकर्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी मायबाप शासनाकडून कायमच वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Farmer Scheme) कार्यान्वित केल्या जातात. पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील मोदी सरकारने (Government) सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी दोन हजार रुपयेचा एक हफ्ता याप्रमाणे ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाते. सध्या शेतकरी बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ताज्या अपडेटनुसार ही रक्कम सप्टेंबरमध्ये कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे.
यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे अटकतात
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी (Agriculture scheme) नोंदणी करताना चुका केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात. आधार कार्डशी नाव जुळले नाही तरी शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात. तुम्ही या यादीत नसल्याची माहिती मिळवण्यासाठी, pmkisan.gov.in वर भेट देऊन, लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव तपासा. याशिवाय, या चुका दुरुस्त करून तुम्ही तुमचा 12 वा हप्ता सुनिश्चित करू शकता.
पीएम किसान योजनेचे पैसे या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत
>ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे
>ज्यांची नावे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या भूमी अभिलेखात नोंदलेली आहेत
>ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त लागवडीयोग्य जमीन आहे
>केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत मंत्रालय/कार्यालये किंवा विभागांमध्ये सेवारत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी
>जे संस्थात्मक शेतकरी आहेत
या तारखेपर्यंत ई-केवायसी करा
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारने अनेक नियम बदलले आहेत. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन शेतकरी 31 ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर तुम्ही ही प्रक्रिया या तारखेपर्यंत पूर्ण केली नाही, तर तुम्हाला 12 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.