Pm Kisan Yojana : केंद्र सरकारने (Central Government) देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) सुरू केली आहे. ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmer Scheme) असून 2018 पासून ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या (Yojana) माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. वार्षिक सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने एकूण तीन हफ्त्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 11 हफ्ते शेतकरी बांधवांना मिळाले आहेत.
अशा परिस्थितीत देशातील करोडो शेतकरी बांधव 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, या योजनेचा बारावा हप्ता हा शेतकऱ्यांना या आठवड्यातच मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की देशातील जवळपास दहा कोटीहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच कल्याणकारी ठरत आहे.
जमिनीच्या नोंदी पडताळणीसाठी विलंब होतोय
पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या 2 हजाराची रक्कम ही दर चार महिन्यांनी दिली जाते. सध्या जमिनीच्या नोंदी पडताळणीच्या कामामुळे हा हप्ता देण्यास विलंब होत आहे. मात्र, आता मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी केलेली नसेल त्यांना 12 व्या हफ्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.
ई-केवायसी लवकरचं करा
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ती लवकरात लवकर करा अन्यथा तुम्ही 12वा हफ्त्यापासून वंचित राहू शकता. सध्या, ई-केवायसीच्या अंतिम मुदतीबाबत जारी केलेले अपडेट वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले आहेत. तथापि, ई-केवायसी करण्याचा पर्याय अद्याप वेबसाइटवर उपलब्ध आहे. निश्चितच या आठवड्यातच पीएम किसानचा हप्ता येणार असल्याने शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.