Pm Kisan Yojana : भारत एक शेतीप्रधान देश असल्याने देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी मायबाप शासन वेगवेगळ्या योजना (Farmer Scheme) कार्यान्वित करत असते. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी तसेच त्यांचे आयुष्य उंचावण्यासाठी मायबाप सरकारने (Government) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही अशीच एक कल्याणकारी योजना सुरू केली आहे.
मायबाप शासनकडून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या थेट खात्यात पैसे पाठवले जात आहेत. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार रुपये पाठवले जातात. सध्या 11 हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले असून, आता ते 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या योजनेचा पैसा का बर अडकतो?
अनेकवेळा शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यात आला नसल्याची तक्रार करतात. वास्तविक, योजनेसाठी नोंदणी करताना झालेली चूक हे यामागचे कारण असू शकते. बँक तपशीलापासून टायपिंगपर्यंतच्या चुकांमुळे सन्मान निधी योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाहीत. काही वेळा नावात चूक होते, त्यामुळे अनेकवेळा तपशील आधार कार्डशी जुळत नाही. अशा परिस्थितीत या योजनेच्या पुढील हप्त्यापासून शेतकरी वंचित राहू शकतात. तथापि, या चुका सुधारण्यासाठी, तुम्ही प्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन त्या दुरुस्त करू शकता.
चुका काय असू शकतात?
शेतकरी बांधवांनी फॉर्म भरताना त्यांचे नाव इंग्रजीत लिहावे.
ज्या शेतकऱ्यांचे नाव अर्जात हिंदीत आहे, त्यांनी ते इंग्रजीत करावे.
अर्जातील नाव आणि बँक खात्यातील अर्जदाराचे नाव वेगळे असल्यास तुमचे पैसे अडकू शकतात.
बँकेचा IFSC कोड, बँक खाते क्रमांक आणि गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली तरी, तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही.
अलीकडे, बँकांच्या विलीनीकरणामुळे IFSC कोड बदलले आहेत. त्यामुळे अर्जदाराला त्याचा नवीन IFSC कोड अपडेट करावा लागेल.
e-KYC ची मुदत वाढवली
सरकारने शेतकर्यांना या योजनेच्या बाबतीत एक दिलासा दिला आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नाही त्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. सरकारने आता ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती.