Pm Kisan Yojana : देशातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. जर तुम्हीही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. खरे तर वर्ष 2024 हे निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. चालू वर्षात एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर राज्यात विधानसभेच्या देखील निवडणुका राहणार आहेत. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट देणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा आगामी सोळावा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. खरे तर या योजनेचा मागील 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला देशातील आठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
त्यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून 18 हजार कोटी रुपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर आता या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेचा पुढील 16 वा हफ्ता केव्हा जमा होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
पीएम किसान योजना नेमकी आहे तरी काय
ही योजना देशातील गरजवंत शेतकऱ्यांसाठी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशा पद्धतीने तीन समान हफ्त्यांमध्ये हा लाभ शेतकऱ्यांना दिला जातोय.
दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता सोळावा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
केव्हा जमा होणार 16 वा हप्ता
पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा सोळावा हप्ता आता लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पुढील महिन्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते.
अशा परिस्थितीत या योजनेचा हप्ता हा आचारसंहितापूर्वी शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा अंदाज आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे.
तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये मार्च महिन्यात या योजनेचा हप्ता जमा होणार असा दावा होत आहे. याबाबत मात्र सध्या स्थितीला केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या योजनेचा हप्ता फेब्रुवारीत जमा होतो की मार्च महिन्यात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.