Pm Kisan Yojana News : आपल्या देशात केंद्रातील सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या फायद्याच्या आणि कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच काही योजना राज्य सरकार सुद्धा चालवत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बहुतांशी योजना शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्राशी रिलेटेड आहेत.
शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या काही योजनेंतर्गत अनुदान दिले जाते तर काही योजनेंतर्गत आर्थिक लाभ देण्याची तरतूद आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ देण्याची तरतूद आहे.
या योजनेतुन पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. 2 हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 18 हप्ते मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे पुढील 19वा हफ्ता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचं खात्यात जमा होणार आहे.
Pm Kisan चा 19वा हफ्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचे शक्यता आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे बोलले जात आहे.
अशातच गेल्या काही दिवसांपासून या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या हफ्त्याची रक्कम वाढवता येईल का ? अखेर यावर सरकारची योजना काय आहे? याबाबत चर्चा सुरू आहेत. दरम्यान आता आपण याच संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सरकार शेतकऱ्यांना दिला जाणारा हप्ता वाढवणार की नाही, याबाबत कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तर दिले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा बंद होणार आहेत.
खरंतर लोकसभेत कृषी राज्यमंत्री महोदयांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा काही प्रस्ताव आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रामनाथ ठाकूर यांनी दिलेल्या उत्तरात ‘सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही,’ असे म्हटले आहे.
त्यांच्या उत्तरावरून हे स्पष्ट झाले की 19 व्या हप्त्यात कोणतीही वाढीव रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नाही, म्हणजेच पुढील हफ्त्याच्या वेळी 2,000 रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाईल.