Pm Kisan Yojana News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील जवळपास 50 टक्के जनसंख्या ही प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळेच आपल्या देशाला कृषीप्रधान देशाचा टॅग मिळाला आहे. हेच कारण आहे की, देशातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेची सुरुवात केंद्रातील मोदी सरकारने केली आहे.
2019 पासून ही योजना सुरू असून या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते.
दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. सतरावा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता.
18 जून 2024 ला वाराणसी अर्थातच काशी येथे एका शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण होते. दरम्यान, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती आणि येथूनच त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर डिपॉझिट केला.
यामुळे आता या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याची आतुरता लागली आहे. या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या योजनेच्या पुढील हफ्त्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता हा दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळून जातील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. मात्र असे असले तरी या संदर्भात अजूनही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यामुळे या योजनेचे पैसे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार का हा मोठा सवाल आहे. तथापि या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे.
याशिवाय, ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल त्यांना हे काम लवकरात लवकर करावे लागणार आहे. ही कामे पूर्ण केली तरच तुम्हाला जीएम किसान सन्मान निधीचा पुढचा म्हणजे 18 वा हप्ता मिळेल, अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहणार आहात.