Pm Kisan Yojana News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळणार आहे. खरे तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि 19 वा हप्ता कधी येणार? याची सर्वच शेतकऱ्यांना आतुरता आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालवली जाते.
ही एक पूर्णपणे केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेसाठी लागणारा सर्व पैसा केंद्र सरकार देते. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने एकूण 18 हप्ते देण्यात आले आहेत.
म्हणजेच ज्या शेतकऱ्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला आहे त्याला आत्तापर्यंत 36 हजार रुपये मिळाले आहेत. दरम्यान आता या योजनेचा 19 वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी येणार ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पीएम किसान) शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. जे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये वितरित केले जातात. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
18 वा हफ्ता पाच ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा पैसा पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचा मावतो यानुसार 19 वा हप्ता फेब्रुवारी (2025) च्या पहिल्या आठवड्यात येणे अपेक्षित आहे. पण, याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मागील हप्ता (18वा हप्ता) 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आला होता. म्हणून 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये येईल असे म्हटले जात आहे. यामुळे आता पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.