Pm Kisan Yojana News : केंद्र शासनाने सुरू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक महात्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहे. मात्र ही सहा हजार रुपयाची रक्कम लाभार्थ्यांना एकरकमी मिळत नाही. अर्थातच ही रक्कम हफ्त्यांनी दिली जाते.
टप्प्याटप्प्याने मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरत आहे. या योजनेअंतर्गत दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हफ्त्यात शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत दोन हजार रुपयांचे एकूण 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहे.
अर्थातच ज्या शेतकऱ्याला अगदी सुरुवातीपासूनच या योजनेचा लाभ मिळाला असेल अशा शेतकऱ्याला आतापर्यंत 30 हजार रुपयाचा लाभ या योजनेच्या माध्यमातून देऊ करण्यात आला आहे.
मागील हप्ता हा पंधरा नोव्हेंबर 2023 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना सोळाव्या हफ्त्याची आतुरता लागलेली आहे. खरे तर यंदाचे वर्ष निवडणुकांचे आहे.
या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत सोबतच राज्यात विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
पीएम किसान योजनेचा पुढील सोळावा हप्ता हा जानेवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होऊ शकतो अशी बातमी प्रसार माध्यमांमध्ये झळकु लागली आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
अशा स्थितीत फेब्रुवारी महिन्यातच आचारसंहिता लागू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे या योजनेचा हप्ता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीचं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
तथापि याबाबत केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार हा सवाल कायम आहे.
पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा पुढील हप्ता लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असा दावा केला जात आहे.