PM Kisan Yojana News : पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना. याची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.
परंतु हे पैसे शेतकऱ्यांना एकाचवेळी मिळतं नाहीत. प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजाराचा हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हप्ते ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना याच्या पुढील हफ्त्याची प्रतीक्षा आहे.
महत्त्वाचे म्हणजे याचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत या योजनेचा 19 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
मागील 18 वा आता पाच ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या महिन्यात वाशिम दौऱ्यावर आले होते. याच दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान चा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.
दरम्यान आता या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी हाती आली आहे. तथापि या संदर्भात केंद्रातील मोदी सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
यामुळे पी एम किसान चा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळणार की त्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे. खरे तर ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे मात्र अनेकांना या योजनेच्या नियमानसंदर्भात अजूनही फारशी माहिती नसल्याचे दिसते.
अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे शेतकरी दुसऱ्याच्या जमिनीत असतात त्यांना याचा लाभ मिळतो का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आम्ही आपणास सांगू इच्छितो दुसऱ्याच्या शेतजमिनी कसणाऱ्या, इतरांच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनाच मिळतो.
तसेच एका शेतकरी कुटुंबातून फक्त एकाच सदस्याला याचा लाभ मिळतो. शेतकरी कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन आहे अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो तसेच कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतो.