Pm Kisan Yojana : देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी शासन कायमच वेगवेगळ्या योजना (Yojana) कार्यान्वित करत असते. 2018 मध्ये देखील केंद्र शासनाने शेतकरी हिताची एक योजना (Farmer Scheme) सुरू केली आहे. पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) असे या योजनेचे नाव असून या योजनेचा लाभ देशभरातील दहा कोटींहून अधिक शेतकरी बांधव घेत आहेत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेत आहेत. मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पात्र शेतकरी बांधवांना आत्तापर्यंत 11 हफ्ते देण्यात आले आहेत.
अशा परिस्थितीत देशभरातील दहा कोटींहून अधिक शेतकरी बांधव आता बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, यावेळी सरकार (Government) शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट देऊ शकते. नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यात 12व्या हफ्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत.
दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत
पीएम किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे एका वर्षात तीन हफ्ते दिले जातात. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे योजनेचा 2 हजाराचा हफ्ता सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
लाभार्थ्यांची संख्या कमी होईल
पीएम किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याबाबत खळबळ उडाली आहे. भुलेख पडताळणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट होईल, असा विश्वास आहे. सध्या भुलेख पडताळणीचे काम अत्यंत काळजीपूर्वक केले जात आहे. यामुळेच 12वा हप्ता रिलीज होण्यास विलंब होत आहे.
येथे तक्रार करा
PM किसान योजनेबाबत तुम्हाला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही PM किसान योजना हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी ([email protected]) वर मेल करू शकता. दरम्यान, जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे.
खरं पाहता केवायसी करण्यासाठी जारी करण्यात आलेली अंतिम मुदत आता संपली आहे तरीदेखील वेबसाईटवर जाऊन शेतकरी बांधव केवायसी करू शकणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना लवकरात लवकर केवायसी करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसेल त्यांना बारावा हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.