Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत शासनाकडून पुरवली जात आहे.
या योजनेअंतर्गत दिले जाणारे वार्षिक सहा हजार रुपये हे एकदा न देता 2 हजाराचा एक हप्ता या पद्धतीने वितरित केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले आहेत. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत 24 हजाराची मदत आत्तापर्यंत मिळाली असेल.
दरम्यान आता या योजनेचे पात्र शेतकरी 13व्या हप्त्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या दोन हजाराची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये तेरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मकर संक्रांतिपूर्वी दिला जाणार असल्याचा दावा केला गेला आहे. याबाबत मात्र केंद्र शासनाकडून कोणतीच अशी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अशातच या योजनेबाबत अजून एक मोठा दावा केला जात आहे, काही मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत आतापर्यंत जे वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत त्यामध्ये शासनाकडून लवकरच वाढ दिली जाऊ शकते. या मीडिया रिपोर्ट मध्ये असं सांगितलं गेलं आहे की, यंदाच्या अर्थसंकल्पमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत दोन हजाराची भर शासनाकडून टाकली जाणार आहे.
म्हणजेच 6000 ऐवजी 8000 रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातील असं या मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेल आहे. मात्र याबाबत शासनाकडून कोणतीच अशी औपचारिक माहिती किंवा घोषणा झालेली नसल्याने याबाबत काय निर्णय होतो हे तर येत्या अर्थसंकल्पातच समजणार आहे. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणार आहे.
यामुळे आता या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहणार आहेत. या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेची निधी वाढवण्याची तरतूद केली जाण्याची शक्यता पाहता यंदाच्या अर्थसंकल्पकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही. एकंदरीत जर या योजनेच्या रकमेत वाढ करण्यात आली तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या करोडो लाभार्थ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे.