Pm Kisan Yojana : भारतातील शेतकरी बांधवांच्या (Farmer) कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत (Farmer Scheme) कोट्यवधी शेतकर्यांना दर तीन महिन्यांत 2 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
ही योजना मोदी सरकारची (Modi Sarkar) एक महत्त्वाकांक्षी योजना असून याला शेतकर्यांच्या सन्मानाची रक्कम देखील म्हणतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11 हप्ते हस्तांतरित करण्यात आले असून लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक कल्याणकारी योजना असून यामुळे देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना मोठा फायदा मिळत आहे.
दरम्यान, आपल्या देशात असे अनेक शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेच्या पात्रतेच्या बाहेर असूनही आर्थिक मदतीचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकार (Central Government) कठोर बनले असून या शेतकऱ्यांना 11वा हप्ता परत करण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
असे असतानाही देशातील अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचे अद्याप पैसे परत केलेले नाहीत. यामुळे आता केंद्र सरकारने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून अशा शेतकऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचा मीडिया रिपोर्टचा दावा आहे.
पीएम किसान रिफंड लिस्टमध्ये अशा पद्धतीने नाव तपासा
जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या पात्रतेबाहेर आहेत किंवा त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. असे शेतकरी त्यांच्या नावाची किंवा पात्रतेची पुष्टी अगदी सहज करू शकतात.
यासाठी पीएम किसान पोर्टलच्या वेबसाइटवर जाऊन फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर क्लिक करा.
येथे आधार क्रमांक आणि शेतकऱ्याचे बँक खाते तपशील यासारखी माहिती भरा.
यानंतर, शेतकऱ्याला त्याचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल, त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पात्र आहात की नाही हे दिसेल.
जर स्क्रीन दाखवते की तुम्ही कोणत्याही परताव्याच्या रकमेसाठी पात्र नाही, तर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी राहाल.
पीएम किसान पोर्टलच्या स्क्रीनवर परताव्याची रक्कम दिसत असल्यास, तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही हे समजून घ्या.
अशा परिस्थितीत शेतकऱ्याला 11 व्या हप्त्याचे पैसे त्वरित परत करावे लागणार आहेत.
ऑनलाइन रिफंड कसा करायचा बर…!
जे शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या पात्रतेच्या बाहेर आहेत त्यांना सन्मान निधीचा 11 वा हप्ता लवकरात लवकर परत करावा लागेल, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी हे काम आतापर्यंत केले नाही ते विलंब न लावता ते करू शकतात.
तुम्ही पीएम किसान ऑनलाइन रिफंड प्रक्रियेद्वारे पैसे परत करू शकता.
सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
पीएम किसानच्या वेबसाइटवरील फार्मर्स कॉर्नरच्या पर्यायावर क्लिक करून रिफंड ऑनलाइन निवडा.
नवीन वेब पेज उघडताच, पैसे भरले नसतील तर आता ऑनलाइन रक्कम परत करण्यासाठी हा पर्याय निवडा.
यानंतर शेतकऱ्याला आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक इत्यादी टाकावे लागतील.
सर्व तपशील भरून कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि डेटा मिळवा बटणावर क्लिक करा.
यानंतर अर्ज स्क्रीनवर उघडेल, तो भरा आणि सबमिट करा.
या प्रक्रियेचे अनुसरण करून शेतकरी चुकून घेतलेले पैसे परत करू शकतात आणि कायदेशीर कारवाई टाळू शकतात.