Pm Kisan Yojana : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो.
या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एक रकमी न देता दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे दिले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेचे एकूण 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. विशेष म्हणजे सोळावा हप्ता हा फेब्रुवारी अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्यात शेतकऱ्यांचा खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी मात्र केंद्रातील मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
खरे तर अर्थसंकल्प झाला की लगेचच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे या आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा होणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार येणारा अर्थसंकल्प हा लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच येत असल्याने या अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेच्या रकमेत वाढ करण्याची मोठी घोषणा केंद्रातील मोदी सरकार करू शकते.
सध्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळत आहेत मात्र यामध्ये आणखी तीन हजाराची वाढ होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
विशेष बाब म्हणजे पीएम पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ दिला जाऊ शकतो असे देखील बोलले जात आहे.
या योजनेतून महिला शेतकऱ्यांना 10 हजार ते बारा हजार रुपये पर्यंतचा लाभ दिला जाईल असे सांगितले जात आहे.
मात्र याबाबत केंद्रातील मोदी सरकारने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे खरंच मोदी सरकार असा निर्णय घेणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.