Pm Kisan Yojana Latest Update : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. खरंतर, पीएम किसान योजना ही एक लोकप्रिय शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे.
मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच लाभ मिळत आहे त्यांना आतापर्यंत 34 हजार रुपये मिळाले आहेत. या योजनेचा सतरावा हप्ता हा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
18 जूनला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आयोजित एका कार्यक्रमातून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. दरम्यान, आता या योजनेच्या पुढील हफ्त्याची शेतकऱ्यांना आतुरता लागून आहे.
आगामी अठरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्यात जमा होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तत्पूर्वी मात्र शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये नुकताच एक मोठा बदल झाला आहे. सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून आता पीएम किसान योजनेचे लाभार्थी पीएम किसान पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे त्यांचा मोबाईल नंबर बदलू शकणार आहेत.
म्हणजेच जर पीएम किसानच्या लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल तर असे लोक पोर्टल वर जाऊन किंवा मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे त्यांचा मोबाईल नंबर चेंज करू शकतात. दरम्यान आता आपण पीएम किसानच्या पोर्टल वर जाऊन मोबाईल नंबर कसा चेंज करायचा आहे थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसा बदलणार मोबाईल नंबर ?
यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नर पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. मग तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून सर्चवर क्लिक करायचे आहे.
यानंतर मग संमती पत्र स्वीकारायचे आहे. मग तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. मग तुम्हाला दिलेल्या रकान्यात हा OTP टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुमची सर्व माहिती तुम्हाला स्क्रीनवर दाखवली जाणार आहे.
मग तुम्हाला खाली एक रिकामा बॉक्स दिसेल. त्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि Get OTP पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल. तो ओटीपी टाकायचा आहे. मग त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुमचा नंबर अपडेट केला जाणार आहे.