Pm Kisan Yojana Latest Update : पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू झालेली केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.
2 हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 15 हप्ते देण्यात आले आहेत.
मागील पंधरावा हप्ता हा छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे.
या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान याचबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
खरेतर सध्या स्थितीला पीएम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना आधी लाभ मिळत होता मात्र आता लाभ मिळत नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवली जात आहे.
ही मोहीम सीएससी सेंटर अंतर्गत राबवली जात असून ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
त्यामुळे पात्र असूनही पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केव्हा वितरित होणार पीएम किसानचा सोळावा हफ्ता
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते मिळाले आहेत. या योजनेचा हप्ता प्रत्येक चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात आहे.
दरम्यान मार्च महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार असल्याने या पीएम किसान योजनेचा पुढील 16 वा हप्ता आचारसंहितेपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, पीएम किसानचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. निश्चितच असे झाल्यास संबंधित पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.