Pm Kisan Yojana Latest Update : केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. या अंतर्गत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातोय.
या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना एक रक्कमी मिळतं नाहीत, दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते.
आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अशातच या योजने संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.
या योजनांच्या नियमांमध्ये केंद्रातील सरकारकडून बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या या नव्या नियमावलीनुसार, वारसा हक्क वगळता सन २०१९ पूर्वी ज्यांनी जमीन खरेदी केली असेल, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पण, आता ‘पीएम किसान’साठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे. तसेच कुटुंबातील फक्त एकालाच लाभ मिळणार आहे. या योजनेत शेतकरी म्हणून एकाच कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एका व्यक्तीला अथवा अठरा वर्षांवरील मुलांना लाभ घेता येतो.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उताऱ्यावर २०१९ पूर्वी नोंद असणाऱ्या अथवा वारसा हक्काने 2019 पूर्वी किंवा नंतर नाव नोंद असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण, या योजनेचा अपात्र असताना अनेकांकडून लाभ घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याचा लाभ पती-पत्नी व मुलगा, २०१९ नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरवाशिणीकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हींकडून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे योजनेतील हिच अडचण दूर करण्यासाठी आता शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.
यामुळे आता या योजनेसाठी अर्ज करताना म्हणजेच नाव नोंदणी करताना पती-पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड देखील जोडावे लागणार आहेत. यामुळे या योजनेतील चुकीचा प्रकार थांबणार असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.
19 वा हप्ता कधी मिळणार?
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता मागील ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता या योजनेचा पुढील 19 वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान याचा संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील होता म्हणजेच 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही मात्र प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा पैसा पात्र शेतकऱ्यांचा खात्यात जमा होतो यानुसार पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये येणार असे म्हटले जात आहे.