Pm Kisan Yojana Latest News : 2019 मध्ये मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार संपूर्ण देशभरातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून ही योजना आतापर्यंत अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.
याअंतर्गत दोन हजार रुपयाचा दर चार महिन्यांनी एक हफ्ता दिला जात आहे. आत्तापर्यंत पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना 14 हप्ते मिळाले आहेत. मागील 14 वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. हा चौदावा हप्ता राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या योजनेच्या पंधराव्या हफ्त्यासंदर्भात देखील एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील पंधरावा हप्ता हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. हा हफ्ता डीबीटीच्या माध्यमातून थेट शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
यासाठीची पूर्वतयारी देखील शासनाकडून सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येतेय यामुळे दिवाळीच्या पूर्वी जर या योजनेचा पुढील हप्ता मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशातच मात्र पीएम किसान योजनेत मोठा बदल झाला असल्याचे समोर आले आहे.
या योजनेच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आला असून या नियमांचे जे शेतकरी पालन करणार नाहीत त्यांना अपात्र ठरवले जाणार आहेत. विशेष म्हणजे अपात्र शेतकऱ्यांकडून या योजनेच्या लाभाची वसुली देखील केली जाणार आहे.
म्हणजेच अपात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत जेवढे पैसे देण्यात आले आहेत तेवढ्या पैशांची वसुली शासनाकडून केली जाणार आहे. यानुसार बिहार राज्यातील तब्बल 81 हजार शेतकऱ्यांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे 81 हजार शेतकरी आयकर भरणारे असल्याने आणि इतर कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत.
यामुळे जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की अपात्र हे जाणून घेणे आवश्यक आहे. दरम्यान आज आपण पीएम किसानसाठी कोणते शेतकरी अपात्र असतील याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन नाही ते शेतकरी यासाठी अपात्र आहेत. तसेच एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतील तर असे शेतकरी यासाठी अपात्र राहतील.
याशिवाय या योजनेसाठी सरकारी कर्मचारी, आजी आणि माजी मंत्री, विधानसभा, राज्यसभा, लोकसभेत सदस्य असलेले लोक, दहा हजारापेक्षा अधिक पेन्शन मिळत असलेले सेवानिवृत्त कर्मचारी, दहा हजारापेक्षा अधिक पेन्शन मिळणारे पेन्शन धारक, आयकर भरणारे शेतकरी हे देखील या योजनेसाठी अपात्र राहतील. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्टचे काम करणारे देखील या योजनेसाठी अपात्र राहतील.