Pm Kisan Yojana Latest News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजनांची घोषणा होत असते. 2019 मध्ये देखील अशाच एका योजनेची घोषणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये पीएम किसान योजनेची घोषणा केली आणि याची अंमलबजावणी त्यांचं वर्षांपासून सुरू झाली.
या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात असतो. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. म्हणजेच या योजनेअंतर्गत मिळणारे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त म्हणजेच एकाचवेळी मिळतं नाहीत.
ही योजना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते मिळालेले आहेत. मागील सतरावा हप्ता हा 18 जून 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
वाराणसी येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमातून अठराव्या हप्त्याचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील नऊ कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत. आपल्या राज्यातीलही लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा मिळतोय.
दरम्यान आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचे वेध लागले आहे. या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार हाच मोठा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील अठरावा हफ्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा हप्ता हा प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतो.
यानुसार या योजनेचा पुढील हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेअंतर्गत दिली जाणारी 6000 रुपयांची रक्कम आता वाढवली जाऊ शकते असा दावा केला जाऊ लागला आहे.
23 जुलै 2024 ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि याच अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी हे या योजनेचे पैसे सहा हजारावरून आठ हजार रुपये करण्याची मोठी घोषणा करणार असल्याचा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जात आहे.
निश्चितच ही घोषणा झाली तर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यामुळे संपूर्ण देशाचे केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेबाबत काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.