Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना ही एक महत्वाची शेतकरी हिताची योजना आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून ही स्कीम अविरतपणे सुरू आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराचा लाभ पुरवला जात आहे.
मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्यांमध्ये दिले जात आहे. या अंतर्गत दिला जाणारा हप्ता हा दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. आतापर्यंत या योजनेचे एकूण 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
या योजनेचा चौदावा हप्ता हा राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमातून 27 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. यानंतरचा पंधरावा हप्ता म्हणजे मागील 15 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यतिरिक्त केला आहे.
म्हणजेच पंधरावा हप्ता वितरित होऊन आता जवळपास पंधरा दिवसांचा काळ उलटला आहे. मात्र पंधरा दिवस झाले असले तरी देखील देशभरातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांना पीएम किसान चा पंधरावा हफ्ता अजून मिळाला नसल्याची तक्रार समोर येत आहे.
यामध्ये असेही अनेक शेतकरी आहेत ज्यांचे नाव बेनिफिशियरी लिस्ट अर्थात लाभार्थी यादीत समाविष्ट आहे मात्र त्यांना दोन हजार रुपये मिळालेले नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यामुळे संबंधित शेतकऱ्यांकडून त्यांना पीएम किसान चा लाभ का मिळाला नाही हा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता पात्र असूनही मिळालेला नसेल तर तुम्ही पीएम किसानच्या हेल्पलाईन नंबर वर कॉल करून तुमच्या समस्याचे निराकरण करू शकता.
पैसे अटकण्याचे कारण काय ?
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसणे, ई केवायसी केलेली नसणे यामुळे या योजनेचा हप्ता अटकू शकतो. याशिवाय जर पी एम किसान योजनेमध्ये अर्ज करताना जेंडर, नाव, आधार नंबर, पत्ता जर चुकीचा टाकला गेला असेल तरीसुद्धा या योजनेचा हप्ता अटकू शकतो. त्यामुळे जर तुमच्याही अर्जात अशी काही चूक झाली असेल तर तुम्हाला ती चूक दुरुस्त करावी लागणार आहे.
कुठे करणार संपर्क
जर, तुम्ही ई-केवायसी, आधार सीडींग केलेली असेल आणि तुमचा अर्ज देखील योग्य असेल पण तरीही तुम्हाला या योजनेचा पंधरावा मिळालेला नसेल तुम्हाला पीएम किसानच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा लागणार आहे.
तुम्ही पीएम किसानच्या ईमेल आयडीवर तुमची तक्रार नोंदवू. [email protected] हा पीएम किसानचा अधिकृत ईमेल आयडी आहे. तुम्ही यावर ई-मेल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.
तसेच तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधून तुम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करू शकणार आहात.