Pm Kisan Yojana : देशातील एक मोठा वर्ग शेतीवर अवलंबून असल्याने भारताला शेतीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं. देशातील बहुसंख्य जनसंख्या शेतीवर (Farming) प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे.
यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही शेती (Agriculture) वर विसंबून असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत भारतीय शेतीला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जावे या अनुषंगाने केंद्रीय स्तरावर वेगवेगळ्या योजना (Agricultural scheme) कार्यान्वित केल्या जातात.
राज्यात देखील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Farmer Scheme) आपल्याला बघायला मिळतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकार आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करत आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Government) देखील शेतकरी (Farmer) हितासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील अशीच एक योजना असून ही योजना मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगितले जाते.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांच्या अंतराने 2-2 हजार रुपये करून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. अर्थातच एका वर्षात शेतकरी बांधवांना दोन हजाराचे तीन हप्ते मिळतात.
आता शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याची आतुरता लागली
मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे, मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 11 हप्ते 10 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. म्हणजे या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 22 हजार रुपये मिळाले आहेत.
मित्रांनो या योजनेचे पात्र शेतकरी बांधव सध्या बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हाती आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम पाठवली जाऊ शकते.
पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर आलं महत्त्वाचा अपडेट
मित्रांनो यादरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक मोठा बदल दिसत आहे. ई-केवायसी आयोजित करण्याच्या तारखेबाबत वेबसाइटवर दिले जाणारे अपडेट पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत.
अशा परीस्थितीत ई-केवायसी करण्याचा पर्याय आता शेतकऱ्यांकडून हिरावून घेतला गेला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भविष्यात शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे शक्य होईल की नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
पीएम किसान या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेच्या वेबसाईटवर झालेल्या या बदलामुळे बारावा हप्ता लवकरच मिळणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. मित्रांनो मध्यंतरी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आले होते.
त्यामुळे तेव्हापासून या योजनेत अनेक बदल देखील केले गेले आहेत. केवायसी देखील याचाच एक भाग आहे. या योजनेत अपात्र आढळलेल्या शेतकऱ्यांकडून योजनेची रक्कम देखील वसूल केली जात आहे. जाणकार लोकांच्या मते आता योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी घट घडून येणार आहे.