Pm Kisan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. नरेंद्र मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी असंख्य योजना सुरू केल्या आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. परंतु हे 6000 शेतकऱ्यांना एकरकमी न देता दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 17 हप्ते देण्यात आले आहेत.
म्हणजेच या योजनेच्या एका पात्र शेतकऱ्याला आतापर्यंत 34 हजार रुपये मिळाले असते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा पुढील हप्ता दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
यामुळे या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र याच महत्वकांशी योजने संदर्भात नुकतेच एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी चुकीचा मोबाईल नंबर म्हणजेच भ्रमणध्वनी क्रमांक नोंदणी केलेला आहे.
पोर्टल वर माहिती अपलोड करताना अनेकांचे मोबाईल नंबर चुकले आहेत. हेच चुकीचे मोबाईल नंबर दुरुस्त करून घेण्यासाठी राज्य शासनाने 15 सप्टेंबर पर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना मुदत दिलेली आहे.
या मुदतीत या योजनेच्या लाभार्थ्यांनी आपला मोबाईल नंबर दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. पी एम किसान चा लाभ घ्यायचा असेल तर आधार संलग्न मोबाईल क्रमांक नोंदणी असणे आवश्यक आहे.
मात्र या नोंदणीवेळी एकच मोबाईल क्रमांक अनेकांच्या नोंदणीसाठी वापर करण्यात आला आहे. यामुळे ज्या लाभार्थ्यांनी चुकीची मोबाईल क्रमांक अपडेट केले असतील त्यांनी हा क्रमांक दुरुस्त करावा असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लाभार्थ्यांना आपला मोबाईल क्रमांक अपडेट करता येणार आहे. यासाठी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फार्मर्स कॉर्नर या पर्यायांमध्ये जात मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे.
मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी लाभार्थ्यांना 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे या मुदतीत लाभार्थ्यांनी हे काम करून घेणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.