Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवण्यात येणारी एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकूण तीन टप्प्यात दिले जातात.
म्हणजेच दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. आतापर्यंत 12 हप्ते या योजनेअंतर्गत मिळाले आहेत. आता शेतकरी बांधव तेराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या योजनेचा अनेक अपात्रांनी लाभ घेतला आहे.
यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत घेतले जात आहेत. जर अपात्र शेतकऱ्यांनी पैसे वापस केले नाहीत तर त्यांच्यावर कडक कारवाई केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या योजनेचा ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्यांना आता योजनेपासून वंचित करण्यात आल आहे.
दरम्यान आता अपात्र शेतकरी बांधवांना पैसे वापस करण्यासाठी शासनाकडून एक अकाउंट नंबर जारी करण्यात आला आहे. तसेच अपात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर योजनेचा पैसा या अकाउंट नंबर वर ट्रान्सफर करण्याचे आवाहन केले जात आहे.
प्राप्तिकरामुळे अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी पैसे इथे परत करावे
acc क्रमांक ४०९०३१३८३२३
ifsc: SBIN0006379
इतर कोणत्याही कारणास्तव अपात्र असल्यास या अकाउंट नंबरवर परत करा
Acc क्रमांक: 4090314046
IFSC कोड: SBIN0006379
पीएम किसान पोर्टलवर ऑनलाइन पैसे कसे परत करायचे
ज्या शेतकऱ्यांनी अपात्र असून देखील या योजनेचा पैसा घेतला असेल त्यांनी पैसे परत देण्यासाठी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रिफंड नाऊचा पर्याय दिसेल
या रिफंड नाऊवर क्लिक करून संबंधित शेतकऱ्याला आधार कार्ड तपशील भरावा लागेल
आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.
आता यांनतर एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यावर पूर्वीच्या पेमेंटशी संबंधित तपशील दृश्यमान असतील.
पेमेंट बॉक्सवर टिक करून मेल आयडी किंवा संपर्क यांसारख्या माहितीची पुष्टी करावी लागेल.
परतावा तपशील पुढील पृष्ठावर दिसतील, त्याची पुष्टी करा
पेमेंट पेजवर बँक निवडा आणि पेमेंट करा. या पद्धतीने शेतकरी बांधव ऑनलाईन पैसे परत करू शकणार आहेत.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, अपात्र शेतकरी बांधवांनी पैसे परत करण्याअगोदर एकदा कृषी विभागाशी संपर्क करून कशा पद्धतीने ऑनलाईन रिफंड केला पाहिजे याविषयी विचारपूस करणे अनिवार्य राहणार आहे. तसेच ऑनलाईन रिफंड केल्यानंतर कृषी विभागाकडून एक पोचपावती देखील शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यात कोणतीच अडचण भासणार नाही.