Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात चालवले जाणारी एक महत्वाकांक्षी अशी शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी लोकांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.
या योजनेचे सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना एकूण तीन हप्त्यात दिले जातात. म्हणजेच दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत मिळत असते. ही एक पूर्णपणे केंद्राच्या माध्यमातून चालवली जाणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 12 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान आता योजनेचे पात्र शेतकरी तेराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की तेरावा हप्ता केवळ केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाचं दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे गरजेचे बनले आहे.
खरं पाहता, आत्तापर्यंत या योजनेचा तेरावा हप्ता हा 23 जानेवारी रोजी पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल असं सांगितलं जात होतं. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या दिवशी देशातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या माध्यमातून या योजनेच्या तेराव्या हफ्त्याचे दोन हजार रुपये हस्तांतरित केले जातील असे अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले होते. मात्र 20 जानेवारी उजाडली आहे.
पण 13वा हफ्ता जाहीर करण्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे 23 जानेवारी रोजी 13वा हफ्ता मिळणार नसल्याचे समजतं आहे. अशातच आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये तेरावा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, हप्त्याच्या तारखेबाबत केंद्र सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
यामुळे तेरावा हप्ता नेमका कधी मिळतो याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही, परंतु जानेवारी महिन्यात तेरावा हप्ता मिळणार नसल्याचे चित्र आहे. निश्चितच पी एम किसान योजनेच्या हफ्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.