Pm Kisan Yojana : देशातील शेतकरी बांधवांच्या (Farmer) कल्याणासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारतवर्षात वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Farmer Scheme) कार्यान्वित केल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Yojana) ही देखील केंद्राची एक अशीच शेतकरी हिताची योजना आहे.
या योजनेच्या (Government Scheme) माध्यमातून संपूर्ण भारतवर्षातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशा एकूण तीन हप्त्यात दिले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपयांचा एक हप्ता पाठवला जातो.
आतापर्यंत संपूर्ण भारतवर्षातील कोट्यावधी शेतकऱ्यांना 11 हप्ते मायबाप शासनाकडून (Government) दिले गेले आहेत. या योजनेचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे शेतकऱ्यांना दिले जाणारे पैसे सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकरी बांधवांना मिळाले असून आता पात्र शेतकरी 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की आपल्या राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
मित्रांनो एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची (Central Government) योजना असून यासाठी संपूर्ण अर्थसाहाय्य केंद्राकडून दिले जाते. दरम्यान, केंद्र सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी योजना पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मित्रांनो खरे पाहता या योजनेसाठी आवश्यक ई-केवायसीची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.
वास्तविक, पूर्वी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करणे आवश्यक होते, परंतु आता ही तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते 31 ऑगस्टपर्यंत केवायसी करून घेऊ शकतात. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की देशभरातील अनेक शेतकरी बांधवांना या योजनेसाठी आवश्यक केवायसी करणे हेतू तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मायबाप शासनाने केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मित्रांनो असे असले तरी शासनाने विहित केलेल्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही ते पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे का?
पीएम किसान योजना ही देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. सदर शासनाची महत्वाकांक्षी योजना सुरू करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी अनेक नियम करण्यात आले होते. सर्वसाधारण शेतकरी बांधवांना या योजनेचे अनेक नियम माहिती नसतात त्यामुळे त्यांच्या मनात अनेक शंका असतात.
यापैकी एक शंका आहे जे की लोक सहसा विचारतात ती म्हणजे पती-पत्नीला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का? तर याच उत्तर आहे नाही. खरं पाहता पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या नियमावलीत, शेतकरी कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला वार्षिक सहा हजार रुपये मिळू शकतात असे स्पष्ट प्रावधान करण्यात आले आहे. यामुळे या योजनेचा लाभ पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच मिळणार आहे.