Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना सुरूवातीला काही मोजक्याचं शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. सुरवातीला या योजनेचा फक्त अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जात होता. मात्र नंतर ही योजना देशातील इतरही अन्य शेतकऱ्यांसाठी खुली झाली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. पण हे 6 हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. 2 हजाराचा एक हफ्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ही योजना केंद्रातील मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना. याचा मागील सोळावा हप्ता आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
यवतमाळ येथील एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याचा पुढील हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पुढील सतरावा हप्ता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला याचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. मात्र काही शेतकऱ्यांची नावे या योजनेतून बाद केली जात आहेत.
लाभार्थ्यांनी बँकेची चुकीची माहिती भरलेली असल्यास, चुकीचा बँक अकॉउंट नंबर दिलेला असल्यास, नियमात बसत नसल्यास, आधार कार्ड हे बँक खात्यास जोडलेले नसल्यास, अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास, ekyc केलेले नसल्यास शेतकऱ्यांचे नाव या योजनेतून कपात केले जाऊ शकते. आता आपण तुमचे नाव पी एम किसान च्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे कसे चेक करायचे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
लाभार्थी यादीत नाव तपासण्याची प्रोसेस कशी आहे
जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करायचे असेल तर यासाठी पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थातच pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन घ्यावे लागणार आहे. लॉगिन घेतल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला Farmers Corner हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
मग Beneficiary Status हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील यापैकी एक निवडा आणि माहिती सबमिट करा. मग तुम्हाला खात्यात रक्कम जमा करण्यात आली की नाही याची माहिती मिळणार आहे. किंवा मग Know Your Status हा पर्याय निवडा आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस चेक करता येणार आहे.
रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर
जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर Know Your Status हा पर्याय निवडा अन मोबाईल क्रमांक टाका. मग Captcha टाका. यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाका. मग तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिसणार आहे.
रजिस्ट्रेशन क्रमांक माहीत झाल्यानंतर मग तुम्ही होमवर जाऊन Know Your Status वर क्लिक करून पुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही याची माहिती जाणून घेऊ शकता.