Pm Kisan Yojana : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघा चार ते पाच दिवसांचा काळ बाकी आहे. तत्पूर्वीच देशातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ करणार आहे. यामुळे गरजवंत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरे तर केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून 2019 मध्ये पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे. ही लोकप्रिय योजना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील योजना आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत आहेत.
दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केंद्र शासनाच्या माध्यमातून केले जाते. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगड येथून जारी झाला आहे.
दरम्यान आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सारे लक्ष पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याकडे आहे. पीएम किसानचा पुढील हप्ता केव्हा मिळणारा हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो.
दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांना दिला जात असल्याने पुढील हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात मिळेल असे सांगितले जात आहे. अशातच आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकार एक मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेची रक्कम आता वाढणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी 2024 मध्ये सादर होणार आहे. विशेष म्हणजे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत.
याशिवाय महाराष्ट्रासहित काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाचणार आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान योजनेची रक्कम वाढवणार असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 साठी एग्रीकल्चर सेक्टरला दोन लाख कोटी रुपयांचे बजेट मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अग्रिकल्चर सेक्टरसाठी 1.44 लाख कोटी रुपये मंजूर झाले होते. दरम्यान आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात ही रक्कम 39 टक्क्यांनी वाढून दोन लाख कोटी रुपये होईल असा अंदाज आहे.
यामुळे निश्चितच देशातील कृषी क्षेत्राला मोठे पाठबळ मिळणार आहे. पी एम किसान योजनेला फेब्रुवारी 2024 मध्ये पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता पीएम किसान योजनेची 6000 रुपयांची रक्कम वाढवून 9000 रुपये एवढी केली जाऊ शकते असा अंदाज आहे.
आगामी निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय वर्तमान मोदी सरकार घेणार असा दावा केला जात आहे. यामुळे आता याबाबत खरंच सकारात्मक निर्णय होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.