Pm Kisan Yojana : तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात का ? मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खर तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसानचा सोळावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा वर्ग होणार असा सवाल उपस्थित केला जात होता.
दरम्यान, PM Kisan च्या सोळाव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच समाप्त होणार आहे. कारण की केंद्र शासनाने पीएम किसानच्या पुढील हफ्त्याची तारीख डिक्लेअर केली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा आगामी सोळावा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. यामुळे या योजनेच्या करोडो लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मागील हफ्ता केव्हा जमा झाला होता ?
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतो.
एका आर्थिक वर्षात 2 हजाराचे तीन हफ्ते शेतकऱ्यांना मिळतात. योजना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत एकूण 15 हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत.
विशेष म्हणजे आगामी सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मागील पंधरावा हफ्ता हा पंधरा नोव्हेंबर 2023 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेला होता.
महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
पीएम किसान योजनेचा लाभ देशभरातील करोडो शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात येत्या बुधवारी हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार अशी बातमी लोकमत या प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे आहे.
या हप्त्याच्या माध्यमातून १,९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे ३ हजार ८०० कोटींचे वितरण सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.