Pm Kisan Yojana : मित्रांनो देशात शेतकरी हिताच्या अनेक योजना (Farmer Scheme) कार्यान्वित आहेत. 2018 पासून मोदी सरकारने देखील पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) नामक एक शेतकरी हिताची योजना (Agricultural Scheme) कार्यान्वित केली आहे.
या योजनेच्या (Yojana) माध्यमातून देशभरातील दहा कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांना (Farmer) दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम दर चार महिन्यांच्या अंतराने 2-2 हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये पाठवली जाते. सध्या 11 वा हप्ता आतापर्यंत 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे.
शेतकरी आता 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, जो सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला येऊ शकतो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील देखील बहुतांशी शेतकरी बांधव या योजनेच्या बाराव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत.
मायबाप शासन दरबारी हालचाली तीव्र झाल्या
12 वा हप्ता केव्हाही जाहीर होणार असल्याच्या संकेतांमुळे खळबळही वाढली आहे. भुलेखांच्या पडताळणीची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर सातत्याने बदल होत आहेत. ई-केवायसीची कालमर्यादा काढून टाकण्यात आली आहे. कृषी मंत्रालयही ट्विटरवर पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेबाबत सतत अपडेट देत आहे. अशा परिस्थितीत पीएम किसानच्या पात्र शेतकरी बांधवांची बाराव्या हफ्त्याबाबत उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.
लाभार्थी यादीत याप्रमाणे तुमचे नाव तपासा
हाती आलेल्या नवीनतम ताज्या अपडेटनुसार, पीएम किसान योजनेबाबत सरकारकडून तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता वर्ग केला जाणार आहे. मात्र, या बाराव्या हप्त्याबाबत अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. पडताळणीमुळे लाभार्थ्यांची घटलेली संख्या पाहता अन्य शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. यामुळे योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शेतकरी लाभार्थी यादीत त्यांचे नाव तपासू शकतात.
हे शेतकरी 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात बर…!
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही ते पीएम किसान या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहू शकतात. या योजनेच्या 12 व्या हप्त्याचा लाभ केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाचं मिळणार आहे.
अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांना या योजनेच्या आगामी हप्त्याचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की, सध्या वेबसाइटवर ई-केवायसी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे या योजनेच्या पात्र शेतकर्यांना जर 12व्या हप्त्याचा लाभ घायचा असेल तर शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.
या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा तुमच्या समस्या दूर होतील
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकरी 155261 या नंबरवर कॉल करून सर्व माहिती मिळवू शकतात. निश्चितच या हेल्पलाइन नंबर मुळे या योजनेच्या पात्र शेतकर्यांना आपल्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यास मदत होणार आहे.